परभणी

सिकलकरी समाज गुन्हेगार म्हणून उल्लेख करणाऱ्या पत्रकारावर कार्यवाही करण्याची मागणी

परभणी -: परभणी वर्तमान पत्रात शिकलकरी समाज गुन्हेगारी वृतीचा असल्याचे एका बातमी वर उल्लेख करणाऱ्या पत्रकारवर कार्यवाही करण्याची मागणी सिख सिकलकरी संघटना महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आली, यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ठाकुरसिंग बावरी यांनी संघटनेचे पदाधिकारी सतनाम सिंह टाक, झैलसिंग बावरी,जॅंहागीर सिंग बावरी, हरमोहनसिंग टाक, युवराज सिंग टाक,राजुसिंग टाक,विजयसिंग जुनी,सागर सिंग टाक,बलराज सिंग जुनी आदि सह जिल्हा अधिकारी परभणी यांना निवेदन देत संबंधीत वर्तमान पत्र तथा पत्रकारा विरोधात कार्यवाही करण्याची मागणी केली आहे, यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ठाकुरसिंग बावरी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, पत्रकारांनी कोणत्याही जाती धर्मा बद्दल टिका करु नये, पत्रकारांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या बातम्या करु नये,ज्या पत्रकाराने शिकलकरी समाजा विरोधात लिखाण केले आहे जिल्हा प्रशासनाकडून त्याच्यावर व संबंधित वर्तमानपत्रावर कार्यवाही करावी अन्यथा सिकलकरी समाज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू करण्यात येईल असं त्यांनी बोलताना सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!