शहरात जनावरे चोरीच्या घटनेत वाढ – पशुपालक चिंतेत

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200
मंगळवार.दि.6.ऑग
पूर्णा प्रतिनिधी :- पूर्णा शहरातील नांदेड रोडवरील चाणक्यनगरी परिसरातून शेड मध्ये बांधलेला एक घोडा अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेला असल्याने मोकाट असलेली तसेच आखाड्यावरील जनावरे चोरणाऱ्या चोरट्यांचे मनोधैर्य वाढल्याने पशुपालकांमध्ये चितेचे वातावरन निर्माण झाले आहे त्या मुळे घोडा चोरी प्रकरणी आजू बाजूच्या परिसरातील आणि रस्त्यावरील सि सी कॅमेरे द्वारे चोरट्यांचा शोध घेतल्यास सदर गुन्हा उघडीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे या बाबत अधिक वृत्त असे कि,शहरातील नांदेड रोडवरील चाणक्य नगरी येथे दिनेश मोगले यांचे एक घोडा एक घोडी आहेत सदरील घोडयाची जोडी रोज रात्री एका शेड मध्ये बांधले जातात परंतु शनिवारी मध्यरात्री एक घोडा गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असता दोन दिवस शोधाशोध करून काल सोमवारी त्यांनी एक घोडा हरवल्याची तक्रार पूर्णा पोलीस ठाण्यात दिली आहे दरम्यान शहरात अनेक दिवसांपासून गाई , म्हशी , गोर्हे ,शेळ्या ,गाढव चोरीच्या घटनेत मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे काही दिवसांपूर्वीच हिंगोली व लातूर जिल्ह्यातील पोलिसांनी जनावरे चोरीचे धागेदोरे पूर्णेत शोधून काढले होते परंतु पूर्णा पोलिसांना मात्र शहरातील जनावरे चोरणारे सापडत नसल्याने पशु पालन करणाऱ्या मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घोडा चोरीचा गुन्हा उघडीस आण्यासाठी पोलीसानी ठोस पाऊल उचलून रस्त्यावरील आणि आजू बाजू परिसरात जर सी सी कॅमरे असल्यास त्याची पाहणी करून घोडा चोराचा शोध घ्या अशी मागणी पुढे येत आहे



