परभणी

विकासाचा अजेंडा घेऊन अनेक कामे मार्गी लावली आ. डॉ. गुट्टे

सोमवार.24.6.2024

पूर्णा प्रतिनिधी

पूर्णा : विकासाचा अजेंडा घेवून मागील साडेचार वर्षात अनेक कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे तीन तालुक्यांचा मतदारसंघ असूनही विकासाचा समतोल राखला आहे. आणखी काही कामे आणि प्रकल्प करणे आवश्यक आहे असे मत रासप आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले.

शहरातील तहसील कार्यालय व कर्मचारी निवासस्थान बांधकाम भूमिपूजन आ.डॉ. गुट्टे यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते. पुढे आ.डॉ. गुट्टे म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील लोकांना चांगली प्रशासकीय सेवा देणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून तहसील कार्यालय व कर्मचारी निवासस्थान बांधकामास अंतिम मंजुरीसह भरघोस निधी उपलब्ध केला आहे. परिणामी, आज त्या बांधकामाचे भूमिपूजन होत आहे.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर म्हणाले की, तालुक्यातील लोकांना गतिमान प्रशासकीय सोईसुविधा उपलब्ध होण्यासाठी या नवीन इमारतीची फार गरज होती. प्रशासनाला पायाभूत सुविधा दिल्या तर कारभार

गतिमान व सुलभ होतो असे सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार माधव बोथीकर, उपअभियंता बालाजी पवार, प्रभारी सुभाष देसाई, गणेशराव कदम, बाळासाहेब कदम, उत्तमराव डोणे, अनंतराव पारवे, हरिभाऊ कदम, नंदकुमार डाखोरे, अॅड. डाखोरे, मुकुंद भोळे, नवनाथ भुसारे, सुदाम वाघमारे, गीताराम देसाई, नाना आवरगंड, अभियंता सुनीला मोरलवार, विश्वनाथ होळकर, बळीराम कदम, मारोती मोहिते यांच्यासह तहसील कर्मचारी, पत्रकार, रासप आणि मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या नियोजित बांधकामात वर्ग एकचे एक, वर्ग दोनचे तीन, वर्ग तीन व चारचे प्रत्येकी आठ निवासस्थाने बांधकाम होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!