सामाजिक

वाळूचा घाट बंद होवूनही विक्रीसाठी वाळूची वाहतूक चालूच महसूल प्रशासन गुल

शुक्रवार.दि.14.जून

पूर्णा प्रतिनिधी :- पूर्णा तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील नदीपात्रातील वाळू उपसा करुन तो शासकीय डेपोवर साठवणूक करण्यासाठी चालू केलेल्या वाळू घाटाची मुदत संपली तरी वाळू विक्रीसाठी टिपरमधून वाळूची वाहतूक चालूच असल्याचे दिसत आहे.खेडेगाव व शहरातील बांधकामासाठी सकाळी लवकर व रात्रीच्या टायमला आर्डर नुसार वाळू पुरवली जात आहे.वाळूचे टेंडर तारीख संपूनही हि वाळू कुठून येत आहे,असा सवाल नागरिक उपस्थित होत आहेत .एक वाळूची गाडी महाग भावाने बांधकाम ठिकाणी नेवून टाकत आहेत.या सगळ्या बाबीकडे महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन पकडून कारवाई कशामुळे करीत नाहीत?असा शूध्दा सवाल लोक करतात.तसेच मागील काही दिवसांपूर्वी कात्नेश्वर येथील मंडळ अधिकारी यानी काय दिवसापूर्वी संध्याकाळी एक वाळूने भरलेला टिपर एका महसूल अधिकारी यानी भांडण करुन तहसील कार्यालयात न लावता पळवून लावला ते टिपर अजूनही फरार आहे.ते तहसील मध्य आणून लावून कारवाई केली नाही.ते टिपर कोणाचे आहे?याचा उलगडा होवू देला नाही.तो गुलदस्त्यात टाकला.महसूल प्रशासन अवैध गौण खनिज कायदाचे उलघन होत असूनही कारवाई करीत नाही.अर्थपूण समझोता दिसत असल्याचे जनतेतून बोलले जाते.याकडे महसूल विभागीय आयुक्त यांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरीकामधून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!