परभणी

परभणी पोलीसां तर्फे व्यसन मुक्त्ती जनजागृती रॅलीचे आयोजन

बुधवार. दि.26.6.2024

परभणी जिल्हा प्रतिनिधी

परभणी :- परभणी जिल्ह्यातील छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने परभणी पोलीसांतर्फे जागतीक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून परभणी जिल्हा पोलीस अधिक्षक, श्री रविंद्रसिंह परदेशी यांनी परभणी पोलीस दलाकडून शहरातील विविध शाळा बालविद्या मंदीर, गांधी विद्यालय, बाल भारती विद्यालय, डॉ. झाकेर हुसेन ‘ऊर्दू शाळा, मोईदुल मुस्लीमीन ऊर्दू शाळा, जि.प. कन्या शाळा, ज्ञान गंगा माध्यमीक व उच्च माध्यमीक शाळा, यांना निमंत्रीत करून परभणी येथील छत्रपती शिवाजी चौक येथे बोलावुन अंमली पदार्थ व्यसनाच्या निषेधार्थ घोष वाक्य फलक, सामाजीक एकतेच्या वेष भूषेत शालेय मुलांनी सहभाग नोंदविला. रॅलीस मा. पोलीस अधिक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. सदर वेळी परभणी पोलीस दलातील बँड पथक व शालेय लेझीम पथक हे रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. रॅलीतील विद्यार्थ्यांनी रॅली दरम्यान व्यसन मुक्तीच्या घोषणा देत रॅली शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून सुरुवात होवुन गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभूजा मंदीर मार्गे नारायण चाळ, शिवाजी पुतळा येथुन पोलीस अधिक्षक कार्यालय येथे पोहचली या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बिस्कीट, केळी व पाणी देण्यात आले. नमुद रॅलीचे आयोजन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अशोक घोरबांड, सपोनि राजु मुत्यपोड, पांडुरंग भारती, पोउपनि वाघमारे, बिरादार, परिहार व स्थागुशा येथील सर्व पोलीस अंमलदार यांनी केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांचे भावना व्यक्त करत आम्हास या रॅलीत सहभागी होऊन अत्यंत आनंद होत असल्याचे सांगुन भविष्यात पोलीस दलात भरती होऊन देश व समाज सेवा करण्याचे भाव उच्चारले. यावेळी पोलीस अधिक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा, शहर वाहतुक शाखा, दहशतवाद विरोधी पथक येथील अधिकारी व अंमलदार, शालेय शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!