शेतकरी पुत्रांनी केली. शेतकऱ्यांची मदत!!

संपादक जाकीर पठाण 9975162200
(बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी)
अहमदपूर :- अहमदपूर तालुक्यातील काही दिवसांपासुन मेघगर्जनेसह विजा व अवकाळी पाऊस पडत आहे.त्यात अहमदपूर तालुक्यातील आजणी गावतिल शेतकरी रंगनाथ घाटोळ यांची म्हैस विज पडून मयत झाली.कळताच घाटोळ कुटुंबाची सभापती मंचकरावजी पाटील साहेब व शेतकरी पुत्र युवराज भैय्या पाटील यांनी भेट घेत शेतकऱ्यांच्या दुखाःत शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभे राहुन शेतकर्यासाठी शासनाच्या मदत होईल तेव्हा होईल असे म्हणत शेतकरी पुत्र युवराज भैय्या पाटील यांनी फुल नाही फुलाची पाकळी मदत करून धीर दिला.!
राजकारणाची परिभाषा तेव्हाच बदलते जेव्हा सर्वसामान्यांचे नेतृत्व हे बंगल्यावर,ए.सी गाडीत बसून नव्हे तर शेताच्या बांधावरून निर्माण होतील.
शेतकऱ्यांच्या व्यथा ही शेतकऱ्यांनाच कळतात.आदर्श घ्यावा या शेतकरी पुत्र युवराज भैय्यांचा.!
यावेळी समवेत बालाजी महाराज, भालेराव चंद्रमणी,मोरे चंद्रकांत, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.




