पूर्णा पोलीस ठाण्यास कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी

पूर्णा प्रतिनिधी
पूर्णा :- पोलीस ठाण्यास कर्तव्यदक्ष पोलिस निरक्षकाची नेमणूक करण्याची मागणी एका निवेदना मा पोलीस महासंचालक मुबई याच्या कडे भ्रष्टाचार विरोधी समतीच्या शहर शाखे तर्फ करण्यात आली आहे पूर्णा पोलीस ठाण्या अंतर्गत दिवसो दिवस गुन्हेगारीत वाढ होत आहे सध्या कार्यरत असलेले पोलिस निरक्षक व त्याच्या नियंत्रणा खाली असलेल्या अधिकाऱ्याचे वचक नसल्याने पूर्णा पोलिस ठाणे अंतर्गत खुलेआम अवैध धंदे बोकाळले आहे.त्याच बरोबर वाळूची तस्करी ही वाढ झाली आहे परिणामी चोऱ्याचे प्रमाणात वाढ होत भर दिवसा लुटण्याचे प्रकार घडत आहे.त्यामुळे पूर्णा पोलीस ठाण्यास कर्तव्यदक्ष पोलीस निरक्षकाची त्वरित नेमणूक करावी अशी मागणी पोलीस महासंचालक मुबई यांना भ्रष्टाचार विरोधी समितीचे शहराध्यक्ष यांनी दिले आहे या निवेदनावर दै प्रजावणीचे पूर्णा तालुका प्रतिनिधी सय्यद कलीम यांची ही स्वाक्षरी आहेत



