मराठवाडा

१ जून पासून धावणार करंटवरील ईंजिनावर रेल्वे गाड्या

संपादक जाकीर पठाण 9975162200

पूर्णा प्रतिनिधी

पूर्णा :-प्रतिनिधी-मराठवाडा विभागातील मनमाड-मुदखेड-सिंकदराबाद,पूर्णा-अकोला,परभणी-परळी-विकाराबाद या लोहमार्गावरील चालू असलेले रेल्वे विद्यूतीकरणाचे काम आता शंभर टक्के पूर्ण झाले असून तारीख १ जून पासून रेल्वे गाड्या ह्या विद्यूतीकरणवरील ईंजिनवर धावणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत्र सुत्राकडून प्राप्त झाली आहे.सदरील तारीख (१ जून पासून) मराठवाड्यातून धावणा-या रेल्वे गाड्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत विद्यूत ईंजिनासह धावणार आहेत.यात लिंगमपल्ली-मुंबई देवगिरी एक्सप्रेस,(१ जून)हैद्राबाद हिस्सार एक्सप्रेस (१ जून),नगरसोल-चेन्नई एक्सप्रेस (३ जून पासून), नांदेड बैंगलौर एक्सप्रेस (३ जून पासून),राजाराणी एक्सप्रेस (३जून पासून),नगरसोल-नरसापूर एक्सप्रेस (३जून पासून), शिर्डी-तिरुपती (४ जून पासून),तपवोन एक्सप्रेस (४ जून पासून),नांदेड दिल्ली मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस (४ जून पासून),हिंगोली मुंबई जन्मशताब्दी एक्सप्रेस ( ६ जून पासून),शिर्डी-विशाखापटणम (६ जून पासून),रामेश्वरम-ओखा (७ जून पासून) चालू होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!