
पालम (प्रतिनिधी) :-
गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यतत्परतेमुळे मौजे.सिपेगाव येथे सुरू असलेल्या बेमुदत सामूहिक उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. परिणामी, आ.डॉ.गुट्टे यांच्या धाडसी निर्णय, आश्वासक बोलणे, अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना यामुळे ‘त्या’ उपोषणकर्त्यांना आ.डॉ.गुट्टे यांच्या कार्यतत्परतेची चुणूक पाहायला मिळाली.
त्याचं झालं असं की, पेठपिंपळगाव-तांबूळगाव-मुदखेड-सिपेगाव रस्त्याचे मजबुतीकरण करणे, या प्रमुख मागणीसाठी काही लोकांनी बेमुदत सामूहिक आमरण उपोषण सुरू केले होते. त्याची माहिती मिळताच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेवून आ.डॉ.गुट्टे हे तातडीने उपोषणस्थळी पोहोचले. उपोषणकर्त्यांशी बोलले आणि त्यांची समजूत काढली.
उपोषणाचा तिढा सोडविण्यासाठी आ.डॉ.गुट्टे यांनी संबंधित रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी तब्बल ५० लाख रूपये आर्थिक निधीसाठी जिल्हा नियोजन समितीस लगेचच पत्र दिले. तसेच पुढील काळात प्रधानमंत्री सडक योजने अंतर्गत कायमचा रस्ता तयार करण्याचे आश्वासन सुध्दा दिले. पुढे उपोषणकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्याशी फोनवरून उपोषणकर्त्यांचे बोलणे करून दिले. पालकमंत्र्यांनी दोन दिवसात निधी उपलब्ध करून देतो, असे सांगितले. त्यामुळे त्या प्रस्तावित कामाचे उद्घघाटन आ.डॉ.गुट्टे यांच्या हस्ते करून अखेर ते आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे, गटविकास अधिकारी उदयसिंह शिसोदे, प्रधानमंत्री सडक योजनेचे कर्मचारी श्री.बाच्छेवार, श्री.सूर्यवंशी, उपअभियंता बी.एम.पवार, रासप जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, माजी सभापती गणेशराव घोरपडे, अजिमखान पठाण, उबेदखान पठाण, बाबासाहेब एंगडे, गणेश घोरपडे, विजय घोरपडे, राहूल शिंदे यांच्यासह तिन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते
न्यूज लोकनायक तालुका प्रतिनिधी बाबासाहेब एंगडे पालम



