
पुर्णा/येथे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत गोधळ घातल्याचा कारणानें झालेल्या मारामारी प्रकरणी सात जणांवर पुर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुर्णा शहरात दि 28 सप्टेंबर गणेश विसर्जनच्या दिवशी आनंद नगर येथील आनंद गणेश मंडळाची मिरवणूक सायंकाळी सात वाजता वाजत गाजत निघाली होती यात मिरवणुक आनंद नगर समोर शिवानंद किराणा दुकाना समोर आली असता नाचतानी काही लोकांनी गोधळ घालण्यात सुरुवात केली तेव्हा गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी गोधळ घालणाऱ्याना मिरवणुकीतून निघून जाण्यास सांगितले असता याचा राग मनांत धरून गोधळ करणाऱ्या आरोपींतानी मंडळाच्या पदाधिकाऱ्यावर चाकुनी जीवे घेणा हल्ला करून मारहाण केली या मध्ये चार जण जखमी झाले होते जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जखमी मंडळाचे अध्यक्ष अजय गलांडे यानी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी प्रथमेश फड,ओकर रावळे,गजानन कुरहे,राहूल म्हैत्रे,राम कदम,दयानंद साबळे,साईनाथ शिदे या सात जणां वर गुरन 232/09 कलम 307,323,143,147,148 ,149,37(1),37(3)भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे



