सामाजिक

व्हाईस ऑफ मीडियाचे पूर्णा तालुकाध्यक्ष आनंद ढोणे पाटील यांचा उत्कृष्ट‌ तालूकाध्यक्ष‌ म्हणून गौरव

संपादक जाकीर पठाण 9975162200

परभणी प्रतिनिधी

परभणी:-प्रतिनीधी व्हॉइस ऑफ मीडिया या देशातील सर्वात मोठ्या आणि वर्ल्ड रेकॉर्ड,ग्रिनीज बुक रेकार्ड मध्य नोंद‌ असलेल्या पत्रकार आणि पत्रकारीतेसाठी भारत देशासह विदेशातही लढा देणा-या संघटनेच्या वतिने नाशिक येथे २५ मे रोजी घेण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशनात व्हाईस ऑफ मीडियाच्या विभाग प्रमुख,जिल्हा व तालूका अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.त्या मध्य मराठवाडा विभागातून‌ परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालूक्याने उत्कृष्ट‌ कार्य केल्याबद्दल व्हॉइस ऑफ मीडियाचे पूर्णा तालूकाध्यक्ष‌ आनंद ढोणे पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देत शाल अर्पण करुन गौरवण्यात आले.सदर कार्यक्रमास व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे,जेष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे,प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के पाटील,कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर,उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ,मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया,संयोजक श्रिकांत सोनवणे,नाशिकचे विशेष पोलिस महानगरीक्षक बि जी शेखर पाटील,परभणी जिल्हाध्यक्ष गजानन देशमूख,सोशियल मिडीया प्रमूख गणेशराव (बार्शी सोलापूर),जिंतूर तालूकाध्यक्ष भागवत चव्हाण,पूर्णा तालूका पदाधिकारी,सुशिल गायकवाड,विष्णू चापके,कृष्णा काळे,नाशीक गरुडझेप अकॅडमचे संचालक, तसेच व्हाईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र राज्यातील असंख्य पदाधिका-यांची यावेळी उपस्थिती होती.या प्रसंगी पत्रकारांनी आपली पत्रकारीता समक्ष ठेवण्यासाठी सकारात्मक आणि निर्भीड पत्रकारीता करावी.असे जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी अवाहन केले.संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी व्हाईस ऑफ मीडियाची पंचसुत्री विषद केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!