नोकरीपरभणीमहाराष्ट्र

एटीएम केंद्राच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांनी घेतला पुढाकार” सर्व बँकांच्या पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

संपादक जाकीर पठाण 9975162200

दिनांक : 29/05/2024

(परभणी प्रतिनिधी)

परभणी :- परभणी पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी दिनांक 28/05/2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात एटीएम सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व बँकांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.राज्यातील विविध ठिकाणी एटीएम केंद्रावरील वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता तसेच विविध ठिकाणी एटीएमवर कार्ड बदलून अथवा अन्य तांत्रिक पध्दतीचा उपयोग करून फसवणूकीचे प्रकार समोर आले आहेत. त्यावरून परभणी पोलीस दलाच्या वतीने एटीएम सुरक्षेसाठी प्राधान्य घेत पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी साहेबांनी पुढाकार घेतला.या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयात बँक व्यवस्थापक, अधिकारी यांची विशेष बैठक घेण्यात आली. सदरबैठकी दरम्यान एटीएम केंद्राच्या सुरक्षे संदर्भात आवश्यक विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. यात एटीएम केंद्राचीसुरक्षा, सुरक्षेसाठी आवश्यक सीसीटीव्ही व्यवस्था, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती याबाबत सुचना दिल्या.यावेळी एसबीआय बँकेचे गुजराथी, अक्षय चौधरी, गणेश वाणी, रणजीत राठोड, आकाश लाटे, प्रकाश मुडे वअॅक्सीस बँकेचे अमोल शिंदे, बुलढाणा अर्बन बँकेचे गिरीष जोशी तसेच शहरातील विविध बँकांचे अधिकारी उपस्थितहोते. तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर श्री. दिनकडंबाळे, पो.नि.स्था.गु.शा.श्री. अशोक घोरबांड, व शहरातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!