राज्यभरात मोटारसायकल चोरणारा परभणी पोलीसांच्या ताब्यात परभणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संपादक जाकीर पठाण 9975162200
दि.28. मे . 2024

(परभणी जिल्हा प्रतिनिधी)
परभणी :- पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी परभणी शहरात होणाऱ्या मोटार सायकल चोरीचा
आढावा घेतला व त्याची गांभीर्याने दखल घेवून गुन्हे उघडकीस आणून आरोपीस अटक करणे बाबत आदेशीत केल होते. त्यावरून पो.नि. स्था.गु.शा. श्री. अशोक घोरबांड यांनी स्था. गु.शा. चे पथक तयार करून त्यांना आदेश व सुचना देऊन रवाना करण्यात आले. स्था.गु.शा.च्या पथकाने परभणी शहरातील चोरीस गेलेल्या मोटार सायकलच्या तपास सुरू केला. सदर गुन्ह्या संदर्भाने स्था.गु.शा.चे पोउपनि अजित बिरादार, पोलीस अंमलदार बालासाहेब तुपसमूद्रे, रवि
जाधव, रफियोद्दीन शेख, निलेश परसोडे, हुसेन पठाण व सायबर चे गणेश कौटकर बालाजी रेड्डी, गौस पठाण यांनी उपलब्ध माहितीच्या आधारावरून बारकाईन तांत्रीक विश्लेषन करून मोटार सायकल चोरीचे बरेच गुन्हे आरोपी अखील महेबुब शेख, रा. मंगळवार पेठ,आंबोजोगाई, जि. बिड ह. मु. परभणी याने केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरूध्द पुरावे गोळा करून त्यास शिताफीने सापळा रचून परळी येथून ताब्यात घेतले असता त्याने परभणी सह इतर जिल्ह्यातील गुन्हे करून अनेक मोटार सायकल चोरल्याची माहिती दिली.
त्यावरून स्था. गु.शा. चे स.पो.नि. भारती, स.पो.नि. मुत्येपोड, पोउपनि गोपिनाथ वाघमारे व पोउपनि अजित
बिरादार यांचे अधिपत्याखाली 4 पथके तयार करून आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे बिड परळी, लातूर, मरूड,
बार्शी-सोलापूर अशा विविध जिल्ह्यातून 20 मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याने चोरलेल्या मोटार सायकलची विल्हेवाट लावणारा त्याचा आणखी एक साथीदार असून त्याच्या कडे काहि मोटार सायकल असल्याबाबतची माहिती आरोपीने दिली असून त्याचा शोध देखील स्था. गु.शा. कडून चालू आहे. सदर आरोपीस
मा.न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास 30/05/2024 पोवतो पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी साहेबांचे मार्गदर्शनाखाली व अपर
पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे साहेबांचे नेतृत्वाखाली पो. नि. स्था.गु.शा. श्री. अशोक घोरबांड, स.पो.नि. भारती,
स.पो.नि.मुत्येपोड, पोउपनि गोपिनाथ वाघमारे व पोउपनि अजित बिरादार, पोलीस अंमलदार बालासाहेब तुपसमूद्रे, रवि जाधव, रफियोद्दीन शेख, निलेश परसोडे, विलास सातपूते, राहूल परसोडे, रंगनाथ दुधाटे, सचिन भदरर्गे, विष्णू चव्हाण,
सिध्देश्वर चाटे, शेख रफीयोदिन, निलेश परसोडे, हनुमान ढगे, संजय घुगे, नामदेव डुबे, मधुकर ढवळे, राम पौळ, दिलीप निलपत्रेवार, परसराम गायकवाड, हुसेन पठाण, कैलास केंद्रे ने. स्था. गु.शा. व सायबर चे गणेश कौटकर बालाजी रेड्डी, गौस पठाण सदर आरोपी कडून आत्ता पर्यंत 20 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून त्यातून परभणी जिल्ह्यातील-06, सोलापूर-02 व लातूर – 02 असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. इतर मिळून आलेल्या मोटारसायकल
संबंधाने दाखल गुन्ह्यांची माहिती घेणे चालू असल्याची माहितीजनसंपर्क अधिकारी,
पोलीस अधीक्षक कार्यालय, परभणी.यांच्या कडून एक प्रसिद्ध पत्रका द्वारे देण्यात आली



