वसमतला रोडरोमीयोच्या सेवे करिता दामीनी पथक सक्रिय करणे आवश्यक

संपादक जाकीर पठाण 9975162200
दि.28 .मे.2024
(हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी)
वसमत शहरात खाजगी शिकवणी ला जाणाऱ्या मुलीं ना टवाळखोर रोडरोमीयो कडुन छेडछाडी च्या घटना ना आळा बसावा व आता शाळा सुरू होत असुन ग्रामीन भागातील मुली वसमत बसस्थानका वर येऊन शहरातील विविध शाळात जातात. त्यापैकी अहिल्या देवी होळकर कन्या शाळेत जास्त प्रमाणात मुली येतात. बसस्टॅंड वर सर्व मुली उतरत असल्यामुळे ति थे अनुचित प्रकार दोन रोमीयो मधे वाद घडण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. कन्या शाळा व इतर शाळांच्या जवळ शाळा भरताना व सुटताना मोटारसायकल वर रोङ रोमीयो थांबलेले असतातच त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. मुला मुलींचे शैक्षणीक प्रबोधना सह नैतीकतेचे धडे देऊण संस्कारक्षम पिढी घडवीणे आवश्यक आहे . मुलींना स्वसंरक्षणा चे धडे देऊण सक्षम बनवीणे व दामीनी पथकाद्वारे रोडरोमीयो चे प्रबोधनात्मक कार्यवाही करूण मुलींची छेडछाडमुक्त अभियान राबवीणे काळाची गरज आहे . स्मार्ट मोबाईल वापरामुळे त्यांच्या दुरुउपयोगा मुळे ही समाजात अनैतिक घटना घडत आहेत .दामीनी पथक ,चिडीमार पथक पूर्वी कार्यरत होते. त्या प्रमाणे वसमत शहरात सक्षम महिला पोलीस अधिकारी देऊण सक्रिय दामीनी पथक सुरु करावे अशी पालकांची मागणी आहे.



