पूर्णा येथील जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूल चे दहावी परीक्षेत घवघवीत यश

संपादक जाकीर पठाण 9975162200
दि.28.मे.2024
पूर्णा प्रतिनिधी
पू्णा:-येथील विद्या प्रसारिणी सभेचे जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूल या शाळेने आपली १००% निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवत शैक्षणिक वर्ष २०२३ २४ साली घवघवीत यश प्राप्त केले.शाळेची विद्यार्थिनी कु. आर्या विनय वाघमारे हिने ९७.४० गुण घेऊन शाळेत पहिला क्रमांक पटकाविला तर सलोनी बालकिशन बरकुंटे आणि मोहंमद उमर यांनी अनुक्रमे ९५ आणि ९४.२० गुण घेऊन द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तर शाळेचा निकाल १००% लागला .शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ दत्तात्रेय वाघमारे सचिव श्रीनिवासजी काबरा उपाध्यक्ष भिमरावजी कदम, मुख्याध्यापिका अतिया बेगम तसेच सर्व शिक्षक वृदानी यशस्वी विद्यार्थ्यांचे व तसेच त्यांच्या पालकांचे अभिनंदन केलेकु. आर्या विनय वाघमारे4गुण 97.40%कु. सलोनी बालकिशन बरकुरेगुण 95%मोहंमद उमर मोहमद आसिफगुण 94.20%



