पूर्णा येथील अभिनव विद्या विहार प्रशाले चे दहावी परीक्षेत घवघवीत यश

संपादक जाकीर पठाण 9975162200
दि.28.मे.2024
पूर्णा प्रतिनिधी
पूर्णा :-येथील अभिनव विद्या विहार प्रशाला या शाळेने आपली उज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साली घवघवीत यश प्राप्त केले.या वर्षी प्रशाळेचा निकाल ९७.१३% लागलापूर्णा शहरातील सर्व माध्यमाच्या शाळामधून सर्वोच्च विध्यार्थी संख्या असणारी शाळाशाळेची विद्यार्थिनी कु.स्नेहा झेलाजी काळे हिने ९८.४०% गुण घेऊन शाळेत पहिला क्रमांक पटकाविला तर कु.प्रेरणा राजू सदावर्ते हिने ९८.००% गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला तर श्रवण पवन पुनपाले याने९७.००% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला. तर शाळेचा निकाल ९७.१३% लागला .शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री गोपाळजी आजमेरा उपाध्यक्ष श्री आनंदजी आजमेरा,सचिव श्री विजय लोणीकर,संचालक श्री दिलीप माने,श्रीहीराजी भोसले मुख्याध्यापक श्री सत्यनारायण रणवीर,पर्यव्यक्षक श्री रमेश सूर्यवंशी तसेच सर्व शिक्षक वृदानी यशस्वी विद्यार्थ्यांचे व तसेच त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले



