सामाजिक

मुंबईतील पत्रकार हर्षल भदाणे यांचे धुळ्यात अपघाती निधंन, पत्रकारी क्षेत्रात शोककळा.

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200

मंगळवार.दि.30. जुलै

संभाजी पुरीगोसावी धुळे जिल्हा प्रतिनिधी

नवी मुंबईतील युवा पत्रकार आणि टाइम्स नाऊ डिजिटल चे प्रतिनिधी हर्षल भदाणे यांचे धुळे जिल्ह्यात अपघातात निधंन झाले आहे, पत्रकार हर्षल बांधणे यांनी झी. 24 तास टीव्ही नाईन जय महाराष्ट्र साम या चॅनेलवर काम केले होते. त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाचा चांगलाच ठसा उमटविला होता. हर्षल भदाणे यांच्या अपघाती निधंनाने पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. धुळे जिल्ह्यातील धुळे औरंगाबाद महामार्गावर गरताड गावाजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला, हर्षल भदाणे हे मुंबईवरून त्यांच्या धुळे जिल्ह्यातील बारकुंड या गावी निघाले होते, तिथून परतत असताना त्यांची कार गरताड गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभी होती. यावेळी समोरून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली आणि कार लांबपर्यंत ओढत नेली. यावेळी हर्षल भदाणे यांनी स्वतःला वाचवण्यासाठी कारमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र ते ट्रकच्या चाकाखाली आले, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, त्या कारमध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे धुळे शहरांसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान धुळे शहर पोलिसांनी सदर ट्रक चालकाला व त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे, हर्षल भदाणे यांनी सात वर्षाहून अधिक कार्यकाळ पत्रकार क्षेत्रात काम केले आहे. मनमिळावू स्वभावामुळे मुंबईतील पत्रकारांच्या वर्तुळात त्यांची चांगलीच ओळख होती. वृत्त,निवेदक आणि पत्रकार अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी चांगल्याच सांभाळल्या होत्या. पत्रकार हर्षल भदाणे यांच्या पश्चांत आई वडील पत्नी असा त्यांचा परिवार होता. कुटुंबातील एकमेव आणि कमावती व्यक्ती होती. त्यांच्या अपघाताची गंभीर दखल घेवुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्वरित धुळे जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पत्रकार हर्षल भदाणे यांना समस्त पुरीगोसावी आणि सातारा जिल्हा रोखठोक वार्ता परिवाराकडूंन भावपूर्ण श्रद्धांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!