परभणी

पूर्णेत जयघोषात निघाली भव्य विठूरायाची पालखी

बुधवार.दि.17 जूलै
पूर्णा प्रतिनिधी-:पूर्णा स्वातंत्र सैनिक (कै.) दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठान च्या वतीने आषाढी महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषात भव्य विठूरायाची पालखी नवा मोंढा येथून काढण्यात आली. प्रारंभी विजयकुमार कदम व मीनाताई कदम तसेच नायब तहसीलदार प्रशांत थारकर पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, भास्करराव भाले यांच्या हस्ते पालखीचे पुजन करण्यात आले. विठुरायाची मूर्ती विराजमान असलेली पालखीची मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत भाविक सहभागी झाले होते. शेकडो मुले मुली वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. वारकरी शिक्षण संस्था मधील भजनी, टाळकरी, लेझीम पथक यांचा सहभाग होता. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. पालखी नवा मोंढा, बस स्थानक रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, स्टेट बँक ऑफ इंडिया, महात्मा बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री गुरु बुद्धी स्वामी मठ संस्थान मार्गे जुना मोंढा मैदानावर आली. या ठिकाणी भव्य असा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. टाळ मृदंगाच्या गजरावर ठेका धरत फुगड्या खेळत अत्यंत उत्साहात धार्मिक वातावरणात भाविकांनी आपला सहभाग नोंदविला श्रीराम मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. डिवायएसपी डॉ. समाधान पाटील, भरत घनदाट, रितेश काळे, शहाजी देसाई, डॉ. विनय वाघमारे, सभापती बालाजी खैरे, अशोक बोकारे आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल कदम यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष एकलारे यांनी प्रास्ताविक केले. गोपाळ भुसारे यांनी सुत्रसंचालन केले. अमृतराज कदम यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!