नोकरीपरभणीमहाराष्ट्र

आंतरराज्यीय जनावर चोर टोळीचा परभणी पोलीसांनी केला पर्दाफाश स्था.गु.शा.ची कारवाई

संपादक जाकीर पठाण 9975162200

रविवार.दि.९.जून.२०२४

परभणी प्रतिनिधी :- परभणी जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात जनावर चोरणारी टोळीचा पर्दाफाश करत परभणी पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण 6 जिल्ह्यातील 25 गुन्ह्यांचा उलगडा केला असून 1,68,500/- रुपये नगदी व गुन्ह्यात वापरलेले वाहन हत्यारे जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच सदर आरोपीतांनी यापुर्वी रात्र गस्त करणाऱ्या वसमत जि. हिंगोली व पुर्णा पोलीसांवर हल्ला केल्याचा गुन्ह्याची देखील उकल झाली आहे.

पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी परभणी जिल्ह्यात चालू वर्षात जनावर चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला. पो.नि.स्था.गु.शा. श्री. अशोक घोरबांड यांना सदर गुन्ह्यांतील आरोपीचा शोध घेवून गुन्हे उघड करण्यासाठी सुचना आदेश दिले.

त्यावरून पो.नि.स्था.गु.शा.श्री. अशोक घोरबांड यांना गोपनिय माहिती मिळाल्यावरून व तांत्रीक विश्लेषनाच्या आधारे स्था.गु.शा.चे स.पो.नि.श्री.पी.डी. भारती, श्री. राजू मुत्येपोड, पोउपनि गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार, चंदनसिंह परिहार यांचे पथके तयार करून रवाना करण्यात आले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी 1) गजानन काशिनाथ वाघमारे, वय 34 वर्षे, रा. शांतीनिकेतन कॉलनी, परभणी यास ताब्यात घेतले असता त्याने व त्याचे साथीदार 2) जाकेर मन्सार कुरेशी, वय 34 वर्षे रा.जमजम कॉलनी दर्गा रोड परभणी व 3) सुरेश देवराव खिल्लारे, वय 34 वर्षे, रा.मंत्री नगर, पंचशील नगर परभणी या आरोपींना स्था.गु.शा. च्या पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांचे हरियाना राज्यातील व स्थानिक इतर 10 साथीदारांच्या मदतीने अनेक गुन्हे केल्याची माहिती दिली.

त्यावरून परभणी जिल्ह्यातील 13 व जालना 1 वाशीम-2, नांदेड-3, लातूर-3 व हिंगोली-3 असे एकूण 25 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. ज्यात गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार, मोबाईल व नगदी 1,68,500/- रुपये व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 5,68,500/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून त्यांचे इतर साथीदारांना ताब्यात घेतल्यानंतर अजून गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!