पूर्णा पोलिस ठाण्यातील ,साहेब माने बोईनवाड यांची ए एस आय पदी पदोन्नती

संपादक जाकीर पठाण 9975162200
गुरुवार.दि.6.जून.2024
पूर्णा प्रतिनिधी
पूर्णा पोलिस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलिस हेड कॉन्स्टेबल साहेब नारायण मानेबोईनवाड यांची महाराष्ट्र पोलिस दलातील दिर्घकालावधीत उत्कृष्ट सेवा बजावल्यामुळे त्यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती पोलिस खात्याअंतर्गत देण्यात आली आहे.त्या बद्दल ए एस आय मानेबोईनवाड यांचा पूर्णा पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, सपोनि दर्शन शिंदे, पोउनि शिवप्रसाद क-हाळे,पोउनि ईंगोले, बंडू राठोड, सतिश पिंपळे,सोनेराव जाधव यासह पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.शब्बीरखान कबीरखान पठाण यांचीही ए एस आय पदी पदोन्नती—-पाथरी पोलिस ठाण्यातील शब्बीर खान कबीरखान पठाण यांचीही सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. त्याबद्दल त्यांचा पोलिस कर्मचारी व नागरीकातून अभिनंदन होत आहे.




