वसमत येथे नागरिक सुविधा केंद्राचे उद्घाटन

संपादक जाकीर पठाण 9975162200
दि.27.मे.2024
(वसमत प्रतिनिधी मोईन कादरी)
वसमत शहरात :-जमाअते इस्लामी हिंद वसमत च्या मार्गदर्शनाखाली आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्ट वसमत तर्फे वसमत शहरात नागरिक सुविधा केंद्र ची सुरुवात येथील राहत बँक मरकज ए इस्लामी लाईन तालाब मध्ये करण्यात आली आहे.सरकारी योजनांच्या सर्व नागरिकांना लाभ मिळावा ह्या हेतूने व तसेच भविष्यात लागणारे महत्त्वपूर्ण कागदपत्रे कमीत कमी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कागदपत्र व सरकारी योजना साठी नागरिकांना त्रास होऊ नये आणि मोठी रक्कम न वसूलता कमी दरात समाजसेवेच्या दृष्टिकोनाने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.उद्घाटन समारोह मौलाना बासित कासमी साहेब यांच्या शुभहस्ते झाला. तसेच उद्घाटन कार्यक्रमात मौलाना इम्तियाज बरकाती साहेब,क़ारी अख़ील कासमी साहेब,सुभाष वाघमारे सर,शेख रियाज सर व अखतर हुसेन सर यांनी कार्यक्रमास उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी अब्दुल रऊफ,सय्यद महेमूद अली,मोहम्मद मिसबाहोद्दीन,मौलाना जाहेद शरीफ,मौलाना खलील साहेब,शेख शाकेर,शेख शौकत,शेख एजाज,लईक सिद्दिकी व वसीम पटेल आदी उपस्थित होते.



