सामाजिक

पेटलेल्या जगाला बुद्ध विचाराने विझवतात-भदत डॉ. उपगुप्त महाथेरो

पूर्णा प्रतिनिधी

पूर्णा – बुद्ध धम्मामध्ये महाबुद्ध वंदनेची परंपरा आहे बुद्ध धम्माचा प्रचार प्रसारासाठी भिक्खु प्रयत्नशिल आहेत, जगात अनेक मार्ग आहेत परंतू बुद्धाच्या विचारा मार्ग शांती करुणा मैत्री चा सत्याचा मार्ग श्रेष्ठ आहे पेटलेल्या जगाला युद्ध होतात त्याला विझवण्या भगवान बुद्धाचा मार्ग आहे असा धम्म उपदेश भदंत डॉ उपगुप्त महाथेरो पूर्णा यांनी केले. पूर्णा येथे पहिल्यादाच भगवान बुद्धाच्या जयतीच्य निमिताने भीम व बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने २५६८ व्या जयंती सोहळ्या निमिताने महाबुद्ध वंदनेच्या कार्यक्रमाचे आयोजन जिप माध्यमिक शाळा बुद्ध विहाराच्या प्रांगणात करण्यात आले होते त्या निमिताने बुद्ध विहार येथे धम्म ध्वजाचे ध्वजारोहण भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले . भबुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना भिक्खु संघाच्या वतीने करण्यात आले . त्या नतर महाबुद्ध वंदना करण्यात आली त्या नतर भगवान बुद्धाच्या प्रतिमेची वाद वृंदासह पूर्णा शहराच्या प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी धम्म मंचावर भदंत डॉ, उपगुप्त महाथेरो भन्ते पंया बोधी थेरो भन्ते रेवत बोधी जयंती मंडळाचे अध्यक्ष भन्ते बोधीधम्मा भन्ते पंयावंश, श्रामणेर संघासह डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे , यशवंत उबारे, प्रकाश कांबळे, मधुकर गायकवाड,अशोक कांबळे , अनिल खर्गखराटे, हर्षवर्धन गायकवाड, शामराव जोगदंड, सुनिल मगरे, एम.यु. खंदारे, देवराव खंदारे, मुकूंद भोळे , अनिल खर्गखराटे, ॲड. धम्मा जोंधळे यांच्यासह पोलीस विभागीय अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलीस निरिक्षक सुभाष गोबाडे, यांच्या बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते डॉ. आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून धम्म ध्वजारोहण भन्ते पंयाबोधी याच्या हस्ते करण्यात आले पुढे उपगुप्त महाथेरो म्हणाले की, भगवान बुद्धाचा मार्ग श्रेष्ठ आहे पंचशिल दहा पारमिता आर्य आष्टागाच आहे बाबा साहेब आंबेडकरांनी चिंतन मनन करून देशात बुद्धाचा मार्ग स्विकारला बुद्ध कल्याणाचा मार्ग आहे त्या मार्गानी आपण चालले पाहिजे आपल्या तील विभार दुर करा सदगुणी सद विचारी बना सन्मार्गाने चला असा धम्म उपदेश दिला. यावेळी भन्ते पंय्याबोधी म्हणाले की पंचशिल हा सुखाचा मार्ग आहे मना मध्ये श्रद्धा महत्वाचे आहे अस्टशिलचे पालन आपण केले पाहिजे बुद्ध धम्मामध्ये वैशाख पौर्णिमेल महत्व आहे असा उपदेश दिला. या कार्यक्रम यशस्वीतेकरिता जयंती मंडळाचे पदाधिकारी साहेबराव सोनवणे, अतूल गवळी, त्र्यंबक कांबळे, अमृत कऱ्हाळे,श्रीकांत हिवाळे सर, सुरज जोंधळे, दिलीप गायकवाड, पी.जी. रणवीर, राम भालेराव,बंटी रणवीर, प्रशांत भालेराव, राहूल धबाले, विजय खंडागळे यांच्यासह बौद्ध महासभा समता सैनिक दल बौद्ध उपासक उपासिका यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!