Uncategorized

मंगलवार मस्जीद पटवे किराणा दुकान समोरील विद्युत लोखंडी पोल खालच्या बुडाला पूर्ण गंजून गेला अनेक लोकांच्या जीव धोक्यात संबंधित अधिकारी गाळ झोपेत

(संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200)

(हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी)

वसमत शहरात मंगळवार मस्जिद समोर बाबुराव पटवे यांच्या किराणा दुकाणा समोर असलेला विजेचा लोखंडी पोल खालच्या बुडाला पूर्ण गंजुन गेला आहे . या भागातील कर्तव्यावरिल विद्युत तारतंत्री लाईन मन ची महावितरण ने पगार बंद केली आहे की या भागात लाईन मनच नाही ? लाईनमन फक्त बिल वसुली करताच या परिसरात येतात? असे अनेक प्रश्न येथील विज ग्राहक विचारत आहेत . मंगळवार मस्जित समोरील विदयुत पोल कोणत्याही क्षणी पडण्याच्या स्थितीत आहे. ही स्थिती येई पर्यंत विदयुत कर्मचारी काय कर्तव्य बजावत आहेत. जर खंबा पडला तर काय अनर्थ होऊ शकतो यांची कल्पना न केलेली बरी . सदरील पोल पूर्ण खालुन सडलेला असुन युद्ध पातळीवर पोल बदलण्याची कार्यवाही करूण जनतेची होणारी हाणी टाळावी .या परिसरातील लाईनमन वर कार्यवाही करूण त्याची बदली करून कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याची नेमणूक करावी . परिसरातील विजग्राहकांना सुरक्षीत करावे असी मागणी जनतेच्या वतीने करण्यात येत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!