Uncategorized

घरफोडी करणारे आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड पो.स्टे. वसमत शहर हददीतील ०२ घरफोडीचे गुन्हे उघड (चोरीला गेलेले २९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ६० तोळे वजनाचे चांदीचे दागीने हस्तगत

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200

( वसमत प्रतिनीधी )

पोलीस स्टेशन वसमत शहर हददीतील मुजिबोददीन सिददीकी रा. जवाहर कॉलणी वसमत यांचेघरी कोणीच नसल्याचे संधी साधुन अज्ञात आरोपींनी घराचे कुलूप तोडुन घरातील सोन्या चांदीचे दागीने चोरी करून नेले होते. त्याबाबत फिर्यादी यांचे तकारी वरून पोस्टे. बसमत शहर येथे दिनांक २९/०२/२०२४ रोजी गुरनं. ११५/२०२४ कलम ४५४,४५७,३८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता. तसेच वसमत शहरातील नामे राजाभाऊ सौदनकर रा. मंगळवारापेठ यांचेभरी कोणीच नसल्याचे संभी साधुन अज्ञात आरोपींनी नगदी रूपये व चांदीचे दागीने चोरी करून नेले होते. त्याबाबत फिर्यादी यांचे तकारी वरून पोस्टे. वसमत शहर येथे दिनांक १०/०५/२०२४ रोजी गुरनं. २५८/२०२४ कलम ४५७,३८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरचा गुन्हे तात्काळ उघड करून गुन्हयातील आरोपींना पकडुन मुददेमाल हस्तगत करणे बाबत मा. पोलीस अधीक्षकहिंगोली .जी.श्रीधर साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेल्प आदेश देवुन मार्गदर्शन केले होते. पोलीस निरीक्षक .विकास पाटील यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे सपोनि राजेश मलपिलु आणि त्यांचे तपास पथकाने सदर घटनास्थळी व परीसरात भेट देवुन तपास केला तसेच गोपनीय बातमीदार व रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत कौशल्यपुर्ण पध्दतीने तपास करूम नमुदचे गुन्हे हे अटटल गुन्हेगार असलेले व ज्यांच्यावर यापुर्वी हिंगोली व नांदेड जिल्हयात घरफोडी/चोरीचे गुन्हे दाखल असलेले नामे १) रमेश सुरेश गायकवाड रा. गणेशपुर ता. वसमत २) सतनामसिंग गुरमुखसिंग चव्हाण रा. वसमत शहर यांनी कैले बाबत निष्पन्न करून नमूद दोन्ही आरोपींना अतिशय शिताफीने ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांनी सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली, तपासात नमुद आरोपीकडून खालील प्रमाणे पोरटे वसमत शहर इददीतील घरफोडीचे गुन्हे उघड करून सोन्या चांदीचे दागीने जप्त करण्यात आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे.) आ. गुरनं. ११५/२०२४ कलम ४५४,४५७,३८०, या गुन्हयात ११५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गलसर०६ ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले रिंग०२ ग्रॅम वजनाचे गुलवी मनी असलेले मंगळसुत्र१० तोळे चांदीचे चैन२५८/२०२४ कलम ४५७,३८० या गुन्हयातील२) छ.गुरनं. २० तोळे चांदीचे ०२ चैनीचे जोड१५ तोळे चांदीचे पायातील जोडवे १५ नग१५ तोळे वजनाचे चांदीचे कडे व बिनले/बाळे असा दोन्ही गुन्हयातील मिळून वरील प्रमाणे चोरून नेलेले सोन्या २९ ग्रॅम वजनाचे दागीने तर चांदीचे ६० तोळे वजनाचे दागीने किंमत ८३,००० रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक हिंगोली .जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक हिंगोली अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक स्थागुशा . विकास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार शेख बाबर, गजानन पोकळे, किशोर कातकडे, विठठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायधन, तुषार ठाकरे, दत्ता नागरे यांनी केली.





Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!