Uncategorized

करंजखोप मध्ये 27 वर्षांनी गुरु-शिष्य- मित्रांची भेट… शालेय शिक्षणाच्या आठवणींना मिळाला उजाळा

दि.23.05.2024

(संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200)

( सातारा जिल्हा प्रतिनिधि)

शालेय जीवनातील महत्त्वांचा टप्पा म्हणजे दहावी यानंतर उच्चमाध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी विखुरले जातात, शिक्षण व्यवसाय नोकरी नंतर वैवाहिक जीवनांच्या घोडदौडीत स्वतःच्या शालेय आणि बालपणाच्या आठवणी विसरुन जावुन मित्र मैत्रिणी यांच्या भेटीगाठी या दुर्मिंळ होऊन जातात, जुन्या बागडलेल्या मैदानातील आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्या उद्योग व्यवसायात विखुरलेल्या आपल्या विद्यार्थी मित्र मंडळींना सर्वांना संपर्क करीत कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप मधील रयत शिक्षण संस्थेचे न्यु इंग्लिश स्कूल जवळपास 27 वर्षांनी एकत्रित येत या सर्व आठवणींना चांगलाच उजाळा मिळाला,* इयत्ता दहावी बॅच 1996 /97 मधील विद्यार्थी विद्यार्थिनी स्नेह मेळावा सोमवारी मोठ्या उत्साहांत संपन्न झाला. यावेळी अनेक दिवसांपासून गुरु शिष्यांची आणि मित्रांची भेट घडून आली. या भेटीमुळे लहानपणीच्या आणि शालेय शिक्षणाच्या आठवणींना चांगलाच उजाळा मिळाला, यासाठी गुरुवर्य शिक्षक श्री बिडे सर, श्री. नलगे सर, श्री बर्गे सर,श्री. शेटे सर, श्री. शिंदे सर, श्री. जाधव सर व श्री. पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती होती. सन 1996/97 इ.10 वी ची बॅच मधील विद्यार्थी – विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते .यावेळी सर्व गुरुजनांचे अतिशय कृतज्ञतापूर्वक स्वागत व सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांनी आपली थोडक्यांत मनोगते व्यक्त केली करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनीही माजी विद्यार्थी व विद्यार्थिंना अतिशय चांगल असं मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी सर शिक्षक देखील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले, जवळपास 27 वर्षानंतर पुन्हा एकदा सर्वांची भेट झाल्याचा आनंद प्रत्येकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उमेश सावंत , सयाजी शिंदे, हनुमंत भोसले,मनोज पवार,विठ्ठल जगताप, संतोष काळे, हेमंत भोईटे, रवींद्र भोईटे, अमोल जगताप, प्रकाश चव्हाण, किशोर सुतार, सुषमा धुमाळ, वनिता धुमाळ, राणी जगताप, यांच्यासह अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी चांगलेच परिश्रम घेतले. यावेळी सैन्य दलातून नुकतेच निवृत्त होऊन आलेले श्री.अमोल जगताप व संतोष जगताप यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. *आजी सोनियाचा दिन सारे भेटले, करंजखोप न्यु इंग्लिश स्कूलमध्ये सारे ऋणाबंधन सारे भाव कृतज्ञतेचे आनंदाच्या लहरी मनामनात आपुले मनोगत आपल्या संगती सारे आपल्या गुरुंच्या त्या आठवणी सांगती सारे शालेय जीवनातील सोनेरी क्षण*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!