राजकीय

बाराबलुतेदार मुस्लिम बुद्धांची एकत्र मूठ बांधून वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या डॉ. भीमराव आंबेडकर

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200


पूर्णा (प्रतिनिधी):- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका निमित्ताने विकासाच्या नावावर निवडणूक न होता जातीपातीच्या नावावर राजकारण चालू आहे महायुती आणि महाविकास आघाडी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आघाडीच्या माध्यमातून बारा बलुतेदार वंचित घराण्याना एकत्र करून सत्तेच्या वाटेवर अनत आहेत. म्हणून आपन सर्व एकत्र येऊन वंचित आघाडीला निवडून देण्याचे आवाहन भारतीय बुद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले.
पूर्णा येथे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सिताराम घनदाट मामा यांच्या प्रचारार्थ डॉ. आंबेडकर चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रचारक डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सिताराम घनदाट मामा होते प्रमुख उपस्थितांमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे प्रा. डॉ.सुरेश शेळके युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, अशोक कांबळे जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा परभणी उपनेते उत्तम खंदारे, नगरसेवक दादाराव पंडित, दिलीप हनुमंते, राजू नारायणकर, दयानंद कदम, गंगाधर बुचाले, रवि वाघमारे, ऑड.हिरानंद गायकवाड,शामसुंदर काळे, अनिल पंडित,राजकुमार सूर्यवंशी, सुनिता साळवे,मजुषाताई पाटील, आदी उपस्थित होते.
आंबेडकर पुढे म्हणाले की महाराष्ट्रात सध्या परिस्थिती वाईट आहे समाजा समाजात वाद वाढत आहेत षडयंत्र सुरू आहे आरक्षणाच्या नावाने जाती पातीत भांडण सुरू आहे मुस्लिम असुरक्षित आहेत. वक्फ बोर्डाचा प्रश्न असो की एन.आर. सी.या प्रशनावर वादळ सुरू आहे. हे सर्व प्रश्न बाळासाहेब आंबेडकरच सोडवु शकतात वंचित बहुजन आघाडीचे 25 ठिकाणावरील उमेदवार निवडून येणार आहेत. अशे सध्या सरकारी एक्झिट पोल नुसार कळते महाराष्ट्र महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत म्हणून मतदारांनी यांच्या भुलथापांना बळी न पडता गंगाखेड विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सिताराम घनदाट मामा बहुमताने निवडून येणारच वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रात सत्ता आल्यास सिताराम घनदाट मामा उद्याचे मंत्री आहेत.
महाराष्ट्रात होणार्या निवडणूकी नंतर सत्तेची चावी ही वंचित बहुजन आघाडीकडे राहील. वंचित बहुजन आघाडी शिवाय कोणाचीही सत्ता स्थापन होणार नाही त्यांसाठी वंचित आघाडीचे उद्योजक कुशल नेतृत्व असणारे सिताराम घनदाट मामा यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करायचे आवाहन केले.
सभेचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले प्रस्ताविक तुषार गायकवाड यांनी व आभार हिरानंद गायकवाड यांनी मानले सभेला यशस्वी करण्यासाठी विजय खंडागळे,ऑड.सिध्दांत गायकवाड, बाळु जोगदंड, प्रबुद्ध काळे, सुकेशनी गोधने, सुमेध हनुमंते व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी वंचित आघाडीचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!