परभणी
पूर्णा शहर कडकडीत बंद सकल हिंदू समाजाच्या वतीने पुर्णा बंदला व्यापारी बाधवांनी दिला 100% प्रतिसादबाजारपेठ कडकडीत बंद

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200
शनिवार.दि.17. ऑग.2024

पुर्णा -: येथे बांगलादेश येथे अल्पसंख्यांक हिंदू समाज बांधवांवर होतअसलेल्या क्रूर अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने पुर्णा बंदचे आवाहन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून बांगलादेश येथील घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध केला सदर बंदमध्ये सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता व सर्व व्यापारी बांधवांनी स्वयंपूर्तीने दुकाने बंद ठेवून बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता.



