अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून समाजाचे विदारक चित्र स्पष्ट होते. अँड मनोज संकाये

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200
गुरुवार.दि.1. ऑग
परळी वैजनाथ प्रतिनिधी बाबा शेख
दीड दिवसाची शाळा शिकलेले अण्णाभाऊ साठे हे थोर साहित्य म्हणून संपूर्ण जगभरात ओळखले जातात. त्यांच्या कादंबरीतून समाजाचे विदारक चित्र स्पष्ट होते. ग्रामीण नायकाला त्यांनी दिलेला न्याय हा सर्वांच्या आठवणीत राहणार असून समाजामध्ये विविध चालीरीती व परंपरा आणि समाज व्यवस्थेचे पसरलेले विष यामुळे गरीब माणसाची होणारी हेळसांड आपल्या लेखणीतून मांडली असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केले. परळी येथील बस स्टँड जवळील अण्णाभाऊ साठे चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी केली.यावेळी जिरेवाडी उपसरपंच राहुल कांदे, शिवा बडे, संदीप चौधरी, मुंजाभाऊ साठे, संतोष कांबळे, प्रवीण रोडे, सुंदर आव्हाड, भरत कांदे,योगेश मुंडे, परमेश्वर गिरी, धनराज गिरी, सोमनाथ गीते, लक्ष्मण पौळ, जयसिंग रोडे आदी उपस्थित होते.



