परभणीमराठवाडासामाजिक

खासदार बंडू उर्फ संजय जाधव यांची बुद्ध विहाराला सदिच्छा भेट….


पूर्णा :
परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी पूर्णा येथील बुद्ध विहाराला दिनांक 27 सप्टेंबर 2023 या दिवशी सायंकाळी सात वाजता सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत परभणी जिल्हा शिवसेनाप्रमुख विशाल कदम उपशहर प्रमुख शंकर गलांडे , श्रीकांत कऱ्हाळे ता. प्रमुख आदींची उपस्थिती होती भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांची निवड अखिल भारतीय भिकू संघाच्या कार्याध्यक्षपदी झाल्याबद्दल खासदार संजय जाधव जिल्हा शिवसेनाप्रमुख विशाल कदम आदींनी पुष्पहार देऊन व लाडू भरवून स्वागत केले. यावेळी भदंत पयावंश यांची प्रमुख उपस्थिती होती.
वीहार समितीच्या वतीने खासदार संजय जाधव व जिल्हा शिवसेनाप्रमुख विशाल कदम यांचे स्वागत उद्योजक गौतम भोळे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव सोनवणे यांनी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ धम्म उपासक अमृत मोरे , टी .झेड .कांबळे, इंजिनीयर पीजी रणवीर , दिलीप गायकवाड , गंगाधर कांबळे, पंडित डोंगरे , गौतम वाघमारे, किशोर ढाकरगे, अतुल गवळी , राहुल धबाले, उमेश बाऱ्हा टे , बळीराम खारे , सुरज जोंधळे आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!