
पूर्णा:
शहरात ईद ए मिलादुन नबीचा सण मोठ्या उत्साहात साजरा
करन्यात आला. दरवर्षी प्रमाणे मोठ्या संख्येने मिरवणुका आणि विविध सामाजिक उपक्रमांनी पैगंबरांचा जन्मदिवस साजरा केला जातो. या वर्षीही शहरातील विविध मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी जामा मशिदीचे इमाम मौलाना शमीम अहमद रिझवी, कुरेशी मशिदीचे इमाम मौलाना रशीद बरकाती व पूर्णा येथील मौलाना आणि उल्मा उपस्थित होते.पोलीस प्रशासन तर्फे बंदोबस्त लावण्यात आला होता.
यावेळी कुरेशी मोहल्ला, मस्तानपुरा,मौलाना आझाद नगर, इकबाल नगर, क्रांतीनगरसह शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात अन्नदानाचा लाभ नागरिकांनी घेतला.जामा मशिदीचे चे पेश इमाम यांनी पूर्णा पोलीस ठाणे चे पुलीस निरीक्षक काकडे साहेबांचे आभार व्यक्त केले..




