Uncategorized

पूर्णा शहरात ‘ईद-उल-अजहा’च्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न; सलोखा राखण्याचे आवाहन

सोमवार 25 मे 2026

पूर्णा (प्रतिनिधी जाकीर पठाण)

येत्या काळात येणाऱ्या ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) सणाच्या निमित्ताने, पूर्णा शहरात धार्मिक सलोखा आणि सामाजिक शांतता अबाधित राखण्याच्या उद्देशाने आज सोमवार, दिनांक २५ मे रोजी पूर्णा पोलीस ठाण्यात शांतता समितीची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ समाधान पाटील हे होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी सण-उत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. सण हा आनंदाचा उत्सव असतो, तो बंधुभावाच्या वातावरणात पार पाडणे ही सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त जबाबदारी आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले.पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.या बैठकीला शहरातील शांतता समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी आपापल्या भागातील प्रश्न मांडून सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बैठकीच्या यशस्वी आयोजनाबद्दल पोलीस प्रशासनाचे कौतुक करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!