पूर्णा शहरातभारतीय जनता पार्टी स्थापना दिवस उत्साहात साजरा

सोमवार 6 एप्रिल 2026
पूर्णा(प्रतिनिधी) ६ एप्रिल रोजी जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्ष !आज हा पक्ष आपल्या जनसेवेची आणि राष्ट्र सेवेची ४६ वर्ष पूर्ण झाले.या निमित्ताने पूर्णा शहरांमध्ये भाजपा शहर मंडळाच्या वतीने शहरातील मध्यवर्ती ठिकाण स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आनंदनगर येथे फटाक्याची आतिषबाजी करत भारतीय जनता पक्षाचे ध्वजारोहन करून स्थापना दिवस जल्लोषात साजरा केला.यावेळी या कार्यक्रमास भाजपा मंडळ अध्यक्ष गोविंद उर्फ राज ठाकर. नगरसेवक लक्ष्मीकांत कदम नगरसेवक भगवान सोळंके चंद्रकांत टाकळकर , प्रशांत कापसे ,मधुकर मुळे ,सोमनाथ आप्पा पळसकर ,बालाजी कदम, भगवान पाटील सर नाना चिटणीस राजेश धूत,गंगाधर महामुनी निलेश कुऱ्हे, रामपुरी, अविनाश मैत्रे रवींद्र बुराड साधनाताई बिछडे संगीताताई गुंडाळे बाळासाहेब बोचरे ऋषिकेश जिरवणकर महेश किरडे विजय खिलोशिया सर्व उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते भारतमातेच्या व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनतर पक्षाच्या आजी माजी सर्व पदाधिकारी यांना मिठाईचे वाटप करण्यात आलेयावेळी कार्यक्रमास पूर्णा शहर मंडळातील आजी-माजी पदाधिकारी नगरसेवक आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते



