Uncategorized

पूर्णा विकास आघाडी आक्रमक अवाजवी कर आकारणी तात्काळ ५० टक्के कमी करण्याची मागणी

शुक्रवार 20 मार्च 2026

(पुर्णा प्रतिनिधी)

पूर्णा नगर परिषदेच्या वतीने सध्या आकारण्यात येत असलेली घरपट्टी, नळपट्टी आणि विविध आस्थापनांवरील कर हे अत्यंत अवाजवी आणि नियमबाह्य आहेत. प्रशासनाने हे कर तात्काळ ५० टक्क्यांनी कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी पूर्णा विकास आघाडी च्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात शुक्रवारी (दि. २०) आघाडीच्या गटनेत्या सौ. मिनाक्षीबाई विजयकुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.नगर परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गटनेत्या मिनाक्षीबाई कदम यांनी प्रशासकीय कारभारावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदेच्या वतीने आकारण्यात आलेले घरपट्टी व नळपट्टीचे कर हे आवाजावी आणि नियमांच्या बाहेर आहेत. नागरिकांना ज्या सेवा दिल्या जात आहेत, त्याचेच कर आकारावेत. प्रशासनाने कोणतेही ‘छुपे कर’ घेऊ नयेत आणि सध्याच्या करात ५० टक्के कपात करावी.तसेच, नगर परिषदेकडून विविध दाखल्यांसाठी आणि प्रमाणपत्रांसाठी आकारली जाणारी फी (शुल्क) मुळीच वाजीब नाही. ही फी कमी करून सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी करावी. प्रमाणपत्रांची फी निश्चित करण्यासाठी नगर परिषद सदस्य आणि संबंधित अधिकारी यांची एक संयुक्त समिती तात्काळ स्थापन करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.या निवेदनावर गटनेत्या मिनाक्षीबाई विजयकुमार कदम, रेखा अनिल खर्गखराटे, प्रकाश बन्सी कांबळे, संतोष आप्पाराव एकलारे, उत्तम मुगाजी खंदारे, रऊफ कुरेशी, राजनंदिनी दादाराव पंडीत, जनाबाई ज्ञानोबा जोधळे, प्रेमला भगवान सोळंके, पुजा सचिन कदम, लक्ष्मीकांत गंगाराम कदम आणि सुनिल जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.नगर परिषदेच्या या अवाजवी कर आकारणीमुळे शहरात नागरिकांमध्ये मोठा असंतोष असून, आता लोकप्रतिनिधींच्या या मागणीवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण पूर्णा शहराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!