Uncategorized

धनगर टाकळी येथे रमजान ईद निमित्त भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन

मंगळवार 17 मार्च 2026

पूर्णा (प्रतिनिधी):रमजान महिन्याचे औचित्य साधून धनगर टाकळी (ता. पूर्णा, जि. परभणी) येथे सर्वधर्मीय सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जोपासण्यासाठी भव्य ‘इफ्तार पार्टी’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे.संयुक्त आयोजनातून सामाजिक सलोखाया इफ्तार पार्टीचे आयोजन प्रा. सैनाजी माठे सर (सरपंच, धनगर टाकळी तथा अध्यक्ष- संजय गांधी निराधार समिती, पूर्णा तालुका) आणि. रमेश सुर्यवंशी (सरपंच, निळा तथा पंचायत समिती सदस्य, धनगर टाकळी गण) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील सर्व स्तरातील नागरिकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.वेळ आणि ठिकाण दिवस: मंगळवार वेळ: सायंकाळी ७:०० वाजता ठिकाण: महेबुबीया मसजित, लोहा रोड, धनगर टाकळी.उपस्थित राहण्याचे आवाहनया इफ्तार पार्टीसाठी धनगर टाकळी आणि परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांनी तसेच सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन आयोजक प्रा. सैनाजी माठे आणि. रमेश सुर्यवंशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!