Uncategorized

कानेगाव नदी पात्रातून अवैध रेती उपसा जोरात प्रशासनाचे दुर्लक्ष आंदोलनाचा इशारा

रविवार 8 मार्च 20260

पूर्णा (प्रतिनिधी):पुर्णा तालुक्यातील कानेगाव नदी शिवार परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असून, यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.या संदर्भात स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे,अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.दिवसाढवळ्या आणि रात्रीही लूट सुरूकानेगाव नदी पात्रात काही वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे.ट्रॅक्टर,बोटी आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने दिवसा आणि रात्रीच्या वेळीही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उपसा सुरू आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमातील नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शासनाचा महसूल धोक्यातया अवैध उत्खननामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचे नुकसान होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल चोरीला जात असूनही महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राजकुमार सोपान सुर्यवंशी आणि मनोज सुभाष भुजबळ यांनी केला आहे.प्रमुख मागण्या:कानेगाव नदी पात्रातील अवैध रेती उत्खनन तात्काळ बंद करावे.उत्खननासाठी वापरली जाणारी वाहने आणि यंत्रसामग्री जप्त करावी.दोषी वाहनमालक आणि संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत.प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कडक पावले उचलावीत.जर अवैध उत्खनन थांबले नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही,तर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. राजकुमार सुर्यवंशी व मनोज भुजबळ (निवेदनकर्ते)या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी परभणी, उपविभागीय अधिकारी गंगाखेड आणि पोलीस अधीक्षक परभणी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!