Uncategorized
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पूर्णेच्या बुद्ध विहाराला सदिच्छा भेट नगरसेवक गौतम भोळे यांच्या हस्ते सत्कार

बुधवार /25/2/26/ फेब्रुवारी
पूर्णा (प्रतिनिधी): आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले (खासदार, राज्यसभा) यांनी आज पूर्णेतील बुद्ध विहाराला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत पूज्य भदंत डॉ. उपगुप्तजी महाथेरो यांची वंदनीय उपस्थिती होती.या भेटीदरम्यान बुद्ध विहार समितीच्या वतीने ना. आठवले साहेबांचा जंगी सत्कार करण्यात आला. नगरसेवक गौतम भोळे यांच्या हस्ते आठवले साहेबांना “लुंबिनी” ही विशेष स्मरणिका आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.



