मोटर सायकल, वाहन चोरी प्रकरणातील दोन आरोपी अटक २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई

मंगळवार, 24/02/2026/ फेब्रुवारी
पुर्णा/प्रतिनिधी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक गुन्हेगारांविषयी माहिती काढत असताना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार संतोष देवराव सातपुते, संतोष भास्कर रायबोले दोघे रा.ताडकळस यांनी आणि इतरांनी मिळून मोटरसायकल आणि इतर चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोपींचा शोध घेतला असता ते मोटरसायकलसह मिळून आले. देवराव सातपुते आणि इतरांना विचारपूस केली असता त्यांनी एक मोटरसायकल, बकरी व तिचे दोन करडू पिकअप वाहनाच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.आरोपींकडून पूर्णा पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्ह्यातील होंडा कंपनीची मोटरसायकलक्रमांक एमएच २२ एमयू ६९२० तसेच पूर्णा पोलीस ठाणे हद्दीतीलच दुसऱ्या एका गुन्ह्यातील अशोक लेलँड कंपनीचा छोटा हत्ती वाहन असे मिळून एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, सगायक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे, पोलीस अंमलदार निलेश भुजबळ, रंगनाथ दुधाटे, उत्तम हनवते, गजानन क्षीरसागर यांनी मिळून केली.



