Uncategorized

रमजान निमित्त पूर्णा शहरात पाणीपुरवठा व स्वच्छतेचे नियोजन करा अनम महिला मंडळा च्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सोमवार 16 फेब्रुवारी 2026

पूर्णा (प्रतिनिधी)

आगामी पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर पूर्णा शहरातील पाणीपुरवठा आणि स्वच्छतेची व्यवस्था तातडीने सुधारण्यात यावी,या मागणीसाठी अनम महिला मंडळ,पूर्णा यांच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.१९ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या उपवासाच्या काळात महिला व नागरिकांची गैरसोय होऊ नये,यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत,अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
पाणीटंचाई आणि स्वच्छतेचा प्रश्न
रमजान महिन्यात पहाटेपासून उपवास (रोझा) धरले जातात.या काळात घरोघरी पाण्याची मोठी गरज असते. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये आणि महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये,यासाठी पाणीपुरवठा नियमित व वेळेवर करावा,असे निवेदनात म्हटले आहे. तसेच,शहरातील अंतर्गत रस्त्यांची आणि प्रभागांची नियमित साफसफाई करून कचऱ्याची विल्हेवाट लावावी, जेणेकरून सणासुदीच्या काळात शहराचे आरोग्य व वातावरण चांगले राहील.
प्रशासनाकडून अपेक्षा
अनम महिला मंडळाने दिलेल्या या निवेदनाची दखल घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित विभागाला सूचना द्याव्यात अशी विनंती करण्यात आली आहे.याप्रसंगी मंडळाच्या पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!