Uncategorized

पवित्र रमजान महिन्यानिमित्त मशिदी परिसरात विद्युत रोषणाई करा नगरसेवक रौफ कुरेशी यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

मंगळवार 17 फेब्रुवारी 2026

पुर्णा (प्रतिनिधी)

पवित्र रमजान महिन्याचे आगमन होत असून, या काळात मुस्लिम बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी पूर्णा शहरातील सर्व १५ ते १६ मशिदींच्या परिसरात तातडीने विद्युत रोषणाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नगरसेवक रौफ कुरेशी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.मुख्याधिकारी, नगर परिषद पूर्णा यांना दिलेल्या निवेदनात रौफ कुरेशी यांनी म्हटले आहे की, रमजान हा अत्यंत पवित्र महिना असून संपूर्ण महिनाभर मुस्लिम बांधव उपवास, तरावीह नमाज पठण आणि कुराण पठण श्रद्धेने करत असतात. रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत मशिदींमध्ये नमाज आणि धार्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल असते. त्यामुळे शहरात रात्रीच्या वेळी उत्साहाचे आणि गर्दीचे वातावरण असते. भाविकांना येण्या-जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील सर्व प्रमुख मशिदींच्या परिसरात नगर परिषदेच्या वतीने विशेष पथदिवे आणि विद्युत रोषणाईची व्यवस्था करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!