पुर्णा पंचायत समिती सदस्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

गुरुवार 12 फेब्रुवारी 2026
पुर्णा तालुक्यात नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या यशवंत सेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्यांचा आज दिनांक 12 फेब्रुवारी गुरुवार रोजी गंगाखेड येथे भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. तालुक्यातील गौर गणातून नरेश उद्धवराव जोगदंड व धनगर टाकळी गणातून गोविंद (रमेश )श्रीपादराव सूर्यवंशी हे यशवंत सैनिक कडून निवडून आले होते देगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विलास बळीराम गिरी हे विजयी झाले होते.गुरुवारी.आ.डॉ. रत्नाकररावजी गुट्टे यांच्या उपस्थितीत त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यात आला.या वेळी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष देसाई,पूर्णा नगराध्यक्ष प्रतिनिधी नितीन उर्फ बंटी कदम हे उपस्थित होते.प्रवेशानंतर भारतीय जनता पार्टीचे पूर्णा पंचायत समितीतील संख्याबळ 7 वर पोहोचले आहे. पूर्णा पंचायत समिती मध्ये या प्रवेशानंतर भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमत झालेआहे.



