Uncategorized

छत्रपती संभाजी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

शनिवार 27 डिसेंबर 2025

पुर्णा (प्रतिनिधी ) पूर्णा तालुक्यातील छत्रपती संभाजी विद्यालय सुहागन येथे गुरुवारी दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा – २०२५ हा कार्यक्रम अतिशय उत्साही व भावनिक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. श्री. समाधान पाटील (पोलीस उपअधीक्षक, पूर्णा) यांच्या शुभहस्ते करण्यात आले या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. ग्याणोजी हरिभाऊ भोसले (ज्येष्ठ संचालक) होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी व गझलकार तथा सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी मा. श्री. बापू दासरी आणि मराठी विभागप्रमुख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील मा. प्रा. डॉ. श्री. वैजनाथ अनमुलवाड उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष हिराजी भोसले उपाध्यक्ष बळीरामजी भोसले सचिव दिलीप माने संचालक धोंडीरामजी भोसले गुणाजी भोसले आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होतेया स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने शाळेतील माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. मार्गदर्शनपर भाषणे, अनुभव कथन, काव्यवाचन व मनोगतांनी कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला.मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाळेच्या उज्ज्वल परंपरेचा गौरव करत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे नमूद केले. माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या यशामागे शाळेने दिलेल्या संस्कारांचा मोठा वाटा असल्याची भावना व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाघमारे सर व प्रभावी पद्धतीने करण्यात आले. शेवटी आभार प्रदर्शनानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा स्नेहमेळावा माजी विद्यार्थ्यांसाठी आठवणींचा अनमोल ठेवा ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!