Uncategorized

अहमद जोहराबी गौस बागवान ह्या सर्वात जास्त लिड ने विजयी उमेदवार ठरल्या

शनिवार 27 डिसेंबर 2025


पूर्णा(प्रतिनिधी)नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत प्रभाग 01 मधून निवडून आलेल्या कॉग्रेस आय चे उमेदवार अहमद जोहराबी गौस बागवान ह्या पूर्णेत सर्वात जास्त 1105 मताच्या लिडने विजयी झाल्याचे उमेदवार ठरल्या आहे त्याचे पुत्र रउफ बागवान याच्या कार्यची दखल घेत त्याना इतक्या मतांनी निवडून दिल्याचे बोले जात आहे.
पूर्णा शहरात यंदा बऱ्याच दिग्गजांनी नपा निवडणूकीत आप आपली प्रतिष्ठा प्रणाला लावली होती मतदारानी मात्र सर्वत्र धक्कादायक कौल दिल्याचे चित्र 21 डिसेंबर रोजी लागलेल्या निकालात दिसून आले आहे काही प्रभागातील उमेदवारास समान मते पडली तर काही उमेदवार फक्त 10 मतांनी निवडून आले आहे त्यामुळे बऱ्याच प्रभागात अटी तटीची लढत पहावयास मिळाली आहे.मात्र प्रभाग क्रमांक 01 मस्तानपुरा,गवळी गल्ली,अजीज नगर मध्ये मात्र युवा नेते रउफ बागवान यांनी बऱ्याच वर्षी पासून या भागात केलेल्या कार्यच्या जोमावर आपल्या आई अहमद जोहराबी गौस याना कॉग्रेस आय तर्फ निवडणूकीत उभे केले मात्र त्यांना प्रतिस्पर्धी माजी नगरसेविका शमीम बेगम शेख चांद (उबाठा),कमलाबाई यादव(यशवंत सेना)यांचे आव्हान होते परंतु 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाच्या नंतर प्रतिस्पर्धी उमेदवार आपणच निवडुन आल्याचे दावे करत होते.21 डिसेंबर रोजी सर्वात आदी प्रभाग 01 चा निकाल लागला या मध्ये कॉग्रेस आयच्या पॅनलचे अहमंद जोहराबी गौस आणि जाकीर कुरेशी हे विजयी झाले.मात्र प्रभाग 01च्या मतदारांनी आहमंद जोहराबी गौस याना सर्वात जास्त 1105 च्या मताच्या लिडने निवडून दिल्याने खरोखरच युवा नेते रउफ बागवान याच्या चांगल्या कामाची दखल घेऊन मतदारांनी त्याच्या आईस इतक्या मोठ्या लिडने निवडून दिल्याचे बोले जात आहे आणि पूर्णा शहरात सर्वात जास्त लिड घेणारे एकमेव उमेदवार असून दुसरी कडे भरघोस मतांनी निवडून दिल्या बद्दल रउफ बागवान आणि जाकीर कुरेशी यांनी सर्व मतदाराचे आभार व्यक्त करून ज्या अपेक्षानी इतक्या मोठ्या मत्ताधीक्यांनी निवडुन दिलं त्याचा अपेक्षा भंग होऊ देणार नाही ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने प्रभागाचा विकास करून मतदारांच्या अडी अडचणी सोडविण्याची हमी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!