धनगर टाकळी येथे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

शुक्रवारी २६ डिसेंबर २०२५
पुर्णा (प्रतिनिधी):पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे शुक्रवारी (दि. २६ डिसेंबर) विविध महत्त्वपूर्ण शासकीय विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार डॉ. रत्नाकरजी गुट्टे साहेब यांच्या शुभहस्ते या कामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावात शादीखाना उभारण्याची घोषणाही आमदार साहेबांनी केली.या विकासकामांचे झाले भूमिपूजन:गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या सोयीसाठी खालील कामांचे भूमिपूजन करण्यात आले:१. ग्रामपंचायत नवीन इमारत: ग्रामस्थांना प्रशासकीय कामासाठी सुसज्ज अशी नवी वास्तू मिळणार आहे.२. तलाठी भवन: महसूल विभागाचे कामकाज अधिक सुलभ होण्यासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालयाचे बांधकाम केले जाणार आहे.३. मातोश्री पांदण रस्ते (८ रस्ते): शेतकऱ्यांची शेतात जाण्याची अडचण दूर करण्यासाठी तब्बल ८ पांदण रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.मुस्लिम समाजाला शब्द, ‘शादीखाना’ देणार!कार्यक्रमादरम्यान धनगर टाकळी येथील मुस्लिम समाज बांधवांनी आपली अडचण मांडताना सांगितले की, गावात लग्नकार्यासाठी किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठी ‘शादीखाना’ उपलब्ध नाही. या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी “मी तुम्हाला शब्द देतो, गावात शादीखाना मी देणार,” असे आश्वासन दिले. त्यांच्या या घोषणेमुळे मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वांनी आमदार साहेबांचे आभार मानले.लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन:यावेळी बोलताना आ. डॉ. रत्नाकर गुट्टे म्हणाले की, “ग्रामीण भागाचा विकास हाच आमचा मुख्य ध्यास आहे. धनगर टाकळी आणि परिसरातील प्रत्येक समाजाला उत्तम सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नवीन ग्रामपंचायत आणि तलाठी भवनामुळे शासकीय कामात पारदर्शकता येईल, तर पांदण रस्त्यांमुळे बळीराजाची मोठी सोय होईल.”उपस्थिती:या सोहळ्यासाठी धनगर टाकळी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी ११:०० वाजता उत्साहात पार पडला.

मुस्लिम समाजाच्या मागणीला प्रतिसाद; गावात भव्य ‘शादीखाना’ उभारण्याचे आमदार साहेबांचे आश्वासन




