Uncategorized

पूर्णा नगरपालिकेवर यशवंत सेनेचा झेंडा; विमलबाई लक्ष्मणराव कदम नगराध्यक्षपदी विजयी

रविवार 21 डिसेंबर 2025

.पूर्णा (प्रतिनिधी):येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखालील यशवंत सेना शहर विकास आघाडीने निर्भेळ यश संपादन केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत यशवंत सेनेने नगराध्यक्ष पदासह सर्वाधिक जागा जिंकून पालिकेची सत्ता काबीज केली आहे. नगराध्यक्षपदी यशवंत सेनेच्या सौ. विमलताई लक्ष्मणराव कदम ३२४ मतांनी विजयी झाल्या आहेत.नगराध्यक्ष पदाची चुरस२१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. नगराध्यक्ष पदासाठी यशवंत सेनेच्या विमलताई कदम आणि शिवसेना (उबाठा) च्या प्रेमला संतोष एकलारे यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. विमलताई कदम यांना ६,७७४ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रेमला एकलारे यांना ६,४५० मते मिळाली. काँग्रेसच्या शेख हसीना बेगम यांनी ५,४८१ मते मिळवून तिसरे स्थान पटकावले. महायुतीच्या उमेदवार कमलबाई कापसे (१,४३६ मते) आणि वंचितच्या आम्रपाली जोंधळे (२,२५८ मते) यांना मतदारांनी नाकारल्याचे पाहायला मिळाले.पक्षनिहाय बलाबलनगरपरिषदेच्या २३ जागांपैकी यशवंत सेनेने ७ जागा जिंकून आघाडी घेतली आहे. काँग्रेसला ६ जागांवर समाधान मानावे लागले, तर भाजप-शिवसेना महायुतीने ४ जागा जिंकल्या. शिवसेना (उबाठा), जनता दल (से) आणि शहर आघाडीला प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत.प्रभागनिहाय विजयी उमेदवार:यशवंत सेना: मिरा होळकर, उत्तम खंदारे, जनाबाई जोंधळे, अर्चना कांबळे, मोकिंद भोळे, लक्ष्मीबाई भालेराव, सुनील जाधव, कौशल्या भोसले.काँग्रेस: जाकीर कुरेशी, अहमद जोहराबी गौस, वंदना कुलदिपके, शमीम बेगम, पद्मीनबाई एंगडे, मोहम्मद हाजी खलील कुरैशी.भाजप-शिवसेना महायुती: लक्ष्मीकांत कदम (भाजप), मिनाक्षीताई कदम, भगवान सोळंके (भाजप), पूजा सचिन कदम (शिवसेना).शिवसेना (उबाठा): रौफ कुरेशी, राजनंदिनी पंडित.जनता दल (से): रेखा खर्गखराटे, प्रकाश कांबळे.बदलाचे वारेया निकालाने पूर्णा शहराच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले आहेत. प्रस्थापित पक्षांना धक्का देत मतदारांनी डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. नवनियुक्त नगराध्यक्ष सौ. विमलताई कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून आता शहर विकासाच्या मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!