Uncategorized

पूर्णा नगर परिषद निवडणूक: प्रभाग १ आणि १० मध्ये मतदारांचा उत्साह; ७०.९२% मतदान संपन्न

शनिवार 20 डिसेंबर 2025

पूर्णा (प्रतिनिधी):पूर्णा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक १ आणि प्रभाग क्रमांक १० साठी आज शांततेत मतदान पार पडले. प्रशासनाने केलेल्या चोख बंदोबस्तात मतदारांनी मोठा उत्साह दाखवला असून, दोन्ही प्रभागांत मिळून सरासरी ७०.९२% मतदानाची नोंद झाली आहे. आता सर्वांच्या नजरा उद्या, २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत.प्रभाग १ मध्ये मतदारांचा उच्चांकमस्तानपुरा आणि गवळी गल्ली परिसर असलेल्या प्रभाग १ मध्ये मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सकाळपासूनच. ज्ञानेश्वर विद्यालय केंद्रावर सर्वाधिक ७५.०% मतदान झाले, तर जि.प. कन्या शाळेतील केंद्रांवर सरासरी ७३% मतदान झाले. या प्रभागाची एकूण टक्केवारी ७४.१% राहिली आहे.प्रभाग १० मध्ये रेल्वे कॉलनी आणि पंचशील नगर परिसर असलेल्या प्रभाग १० मध्ये मतदानाची टक्केवारी ६६.८% राहिली. पंचशील नगरमधील सावित्री माता फुले प्राथमिक शाळेत ७१% मतदान झाले, तर रेल्वे ट्रेनिंग सेंटर केंद्रावर एकूण मतदार: ५,५५० झालेले एकूण मतदान: ३,९३६पुरुष मतदान: ७३.७% महिला मतदान: ६८.२% सरासरी मतदान: ७०.९२%उद्या निकालाचा फैसलानिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रक्रिया पार पडनार आहे दोन्ही प्रभागांतील उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे. उद्या, २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर पूर्णा नगर परिषदेत कोणाचे वर्चस्व राहणार, हे स्पष्ट होईल. या निकालामुळे शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!