Uncategorized

तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

गुरुवार १८ डिसेंबर २०२५

पुर्णा (प्रतिनिधी):कोळी महादेव आणि टोकरे कोळी जमातीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पुर्णा येथील तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. आदिवासी विकास मंत्र्यांच्या उदासिनतेचा निषेध नोंदवत, आता थेट मुख्यमंत्र्यांनीच या विषयात हस्तक्षेप करावा, अशी मागणी समाजबांधवांनी केली आहे.निवेदनातील प्रमुख मागण्या:१. अनुसूचित जमातीच्या कोळी महादेव जात प्रमाणपत्र व जात वैधता सुलभ रित्या मिळने२. जात पडताळणी प्रक्रियेतील त्रुटी दूर करून सुलभता आणावी.३. ४ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेऊन आंदोलकांवरील अन्याय दूर करावा.तहसीलदारांना निवेदन देताना समाज बांधवांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. “निवेदन देऊनही जर शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर पुर्णा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!