Uncategorized

शेतीच्या वादातून दिराने केली भावजयला बेदम मारहाण

बुधवार १७ डिसेंबर २०२५

पूर्णा:शेतीच्या वादातून दिराने पत्नी मुलगा आणि सून यांना सोबत घेऊन भावजयीला बेदम मारहाण केल्याची घटना पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे घडली असून याप्रकरणी चार जणांवर पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.आहेरवाडी येथील धुरपदाबाई लक्ष्मण खंदारे यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार धुरपदाबाई खंदारे यांचा दीर नामदेव खंदारे यांच्यासोबत शेतीचा जुना वाद आहे. यापूर्वी देखील वादाची घटना घडली होती. तसेच एकमेकांविरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 14 डिसेंबर रोजी धुरपदाबाई खंदारे या त्यांच्या मुलासह शेतात कापूस वेचणी करत असताना नामदेव खंदारे हा पत्नी शांताबाई, मुलगा माधव,सून ज्योती यांना घेऊन आला.त्यांनी डोळ्यात चटणी टाकून लाकडाने धुरपदाबाई खंदारे व त्यांचा मुलगा गौतम याला बेदम मारहाण केली त्यांनी आरडाओरड केल्याने त्यांच्या मोठ्या जाऊ पंचाबाई खंदारे यांनी घटनास्थळी येऊन भांडण सोडवले या घटनेनंतर धुरपदाबाई खंदारे यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!