पूर्णा नगरपरिषद निवडणुक पोलीसांच्या कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रशासकीय नियोजनाचा नागरिकांना आधार

शनिवार 20 डिसेंबर 2025
पूर्णा (प्रतिनिधी):नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ ‘ब’ आणि प्रभाग १० ‘ब’ या दोन जागांसाठी आज (२० डिसेंबर) सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसून येत आहे.मतदान सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत. प्रभाग क्र. १ ‘ब’ आणि १० ‘ब’.काही तांत्रिक आणि न्यायालयीन कारणांमुळे या दोन प्रभागांतील निवडणूक २ डिसेंबर रोजी होऊ शकली नव्हती. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज दि 20 डिसेंबर रोजी मतदान पार पडत आहे. या दोन जागांसाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनीही नशीब आजमावले असून, या प्रभागांमधील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.प्रशासकीय तयारी:निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिसांनी मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त तैनात केला आहे. ईव्हीएम मशिनची तपासणी आणि सीलिंग प्रक्रिया कालच पूर्ण करण्यात आली होती. मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी निवडणूक विभागाने आवश्यक त्या सोयीसुविधा केंद्रांवर उपलब्ध करून दिल्या आहेत.या दोन प्रभागांतील मतदानाचा टक्का किती राहतो आणि उद्या गुलाल कोणाचा उधळला जातो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.दरम्यान दोन्ही ठिकाणी सकाळी 12 पर्यत 15 टक्के मतदान झाले होते.दुपार नंतर मतदानाची टक्के वारी वाढण्याची शक्यता असून सद्या मतदान प्रक्रिया शाततेत सुरु आहे निवडणूक पथकाने मतदान केंद्रावर भेटी देऊन आढावा घेत आहे








