Uncategorized
श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सोहळा उत्साहात साजरी

पूर्णा : आज दिनांक 08 ऑक्टोबर रोजी श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.गजानन कुरुंदकर यांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे, पर्यवेक्षक उमाशंकर मिटकरी उपप्राचार्य डाफने, वसंतराव कदम, संजय कापुरे,मंचक वळसे, नागोराव सावळे, दत्ता जाधव, गजानन भालेराव, महाविद्यालयीन विदयार्थी व विद्यार्थिनी यांची उपस्थित होती.हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना (NSS)तर्फे आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी
प्रा. डॉ. राजू शेख व डॉ. दैवशाला कामठाणे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या बद्दल सर्व उपस्थितांचे आभार मानले.



