न्यायव्यवस्थेत उच्च पदावर गेलेल्या न्यायमूर्तींचा पूर्णा वकील संघातर्फे भव्य सत्कार

रविवार 14 डिसेंबर 2025
परभणी / पूर्णा: येथील पूर्णा वकील संघाच्या वतीने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे नवनियुक्त झालेले मा. न्यायमूर्ती आणि तालुक्यातील न्यायिक अधिकारी यांच्या सन्मानार्थ दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात १४ डिसेंबर २०२५ रोजी भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न भा.वराळे यांच्यासह उच्च न्यायालयातील अनेक न्यायमूर्तींची विशेष उपस्थिती लाभली.या समारंभाचे अध्यक्षस्थान मा. न्यायमूर्ती अनिल एस.किलोर (प्रशासकीय न्यायमूर्ती,खंडपीठ नागपूर) यांनी भूषवले. मा. न्यायमूर्ती ए.एल. पानसरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मा. न्यायमूर्ती वराळे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत गीताने मान्यवरांचा स्वागत करण्यात आलासत्कारमूर्ती मा. अतिरिक्त न्यायमूर्ती पी.सचिन देशमुख आणि मा.अतिरिक्त न्यायमूर्ती.महेंद्र नेरलीकर यांचा पूर्णा वकील संघातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात न्यायव्यवस्थेतील आव्हाने, युवा वकिलांची भूमिका आणि सामान्य नागरिकांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांनी करायचे प्रयत्न,यावर भाष्य केले.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वराळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पूर्णा वकील संघाने न्यायमूर्तींचा सत्कार करून दाखवलेली एकता आणि आदरभाव कौतुकास्पद असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन वकील संघ,पूर्णा जि. परभणी यांनी केले. सदर कार्यक्रमामुळे न्यायिक अधिकारी आणि वकील यांच्यात समन्वय वाढण्यास मदत झाली,असे मत पूर्णा वकील संघाचे अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन वकील संघाचे सचिव ए.बी. शेख व एडवोकेट शिरसाट त्यांनी केले आभार प्रदर्शन ए.बी.शेख यांनी केले कार्यक्रमाच्या समारोपात स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे उपाध्यक्ष एडवोकेट हिरानंद, कोषाध्यक्ष स्वप्निल कुमार जमदाडे, वैजनाथ लांडे, प्रमोद खंदारे, सिद्धांत गायकवाड, एम.बी. जोगदंड, एडवोकेट एम ए. सईद, एस पी सोनी, एस जी मोहिते, आर.ए. देवकते, ओमराज वाळवंटे, जी.एन. डाखोरे, गोविंद शिंदे, वाय.एस.डाखोरे, वाहेद अहमद, अब्दुल हफिज, सूर्यकांत काळे, सोवियत जोगदंड इत्यादी विधीज्ञानी व वकील संघातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.



